नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी हिमायतनगर शहरात तेलंगणा राज्यातून अवैद्य विक्रीसाठी वाहनातून घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनसह १५ लाख ८० हजारांचा गुटखा पकडला आहे. तेलंगणा राज्यातून पिकअप बोलेरो मधून हिमायतनगर शहरात अवैधरित्या विक्रीसाठी गुटखा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शोध पथकास मिळाली होती.
पथकाने पळत ठेऊन पिकअप वाहनाला हिमायतनगर-सवना रस्त्यावरील रेल्वे अंडर ब्रिजवर सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अडवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर हानुसिंघ चव्हाण यांनी व त्यांच्या पथकाने पाहणी केली. त्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनामध्ये बंदी असलेला गुटखा आढळून आला. यावेळी वाहनाला हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता या वाहनांमध्ये एकूण १० लाख ८० हजार रुपयाचा अवैद्य सुगंधित गुटखा, ४ चाकी वाहन (एम. एच. २६-बीइ ५७८५) किंमत ५ लाख रुपये असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून वाहनचालक शे.गफ्फार शे. बाबू (रा.रहीम कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भामध्ये हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण हे करत आहेत. सदरील जप्त करण्यात आलेला माल हिमायतनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर गुटख्याची खरी किंमत समोर येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- रिया चक्रवर्तीच्या ‘त्या’ फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<