हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास १ कोटींचे बक्षीस :एमआयएम

mim party

टीम महाराष्ट्र देशा- हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास आम्ही १ कोटींचे बक्षीस देऊ, अशी घोषणा एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनी केली आहे. गुरुशांत पट्टेदार हे कलबुर्गी जिल्ह्याचे माजी पंचायत सदस्य आहेत.संविधानात बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे विधान केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी मंगळवारी केले होते.या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. संविधानानेच त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, याच संविधानात वारंवार बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हीही असे बदल करू, हे त्यांनी लक्षात ठेवावे. संविधानात बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी केले होते.