fbpx

पुण्यात ‘गुरुजी ऑन डिमांड’

टीम महाराष्ट्र देशा : तुम्हाला तुमच्या घरात एखाद धार्मिक कार्य करायच असेल आणि त्यासाठी गुरुजी मिळत नसतील तर आता चिंता करू नका कारण तुम्हाला आता पुण्यात गुरुजी ऑन डिमांड या वेबसाइटवरून गुरुजीही आणि विधीसाठी लागणारी सामग्रीही उपलब्ध होऊ शकणार आहे. आणि तेही एका क्लिकवर. प्रणव चावरे, अक्षय चावरे, अभिषेक कुलकर्णी आणि अजित चावरे या युवकांनी मिळून गुरुजी ऑन डिमांड हि वेबसाइट सुरू केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.याचा अँपही तयार करण्यात आले असून लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजन तावरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेबसाइटवर १३३ प्रकारच्या धार्मिक विधीबाबत ची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे शिवाय कोणत्याही विधीसाठी लागणारे गुरुजी उपलब्ध होऊ शकणार आहेत.या वेबसाइटवर दोनशे गुरुजींची नोंद करण्यात आली आहे.पूजेसाठी लागणारे साहित्यही तुम्ही या वेबसाइटवरुन किंवा अँपवरून मागवू शकता.विशेष म्हणजे चोवीस बाय सात येथे तुम्ही बुकिंग करू शकता.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील पन्नास किलोमीटरच्या परिसरात सध्या ही सेवा उपलब्ध असून संपूर्ण पुणे शहरासाठी गुरुजींची दक्षिणाही एकच असणार असल्याची माहिती या वेबसाइट आणि अँपचे निर्माते प्रणव चावरे यांनी सांगितली.