काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत, काळाच्या पडद्याआड

टीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज निधन झालं. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना आज सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते.

त्याचा थोडक्यात राजकीय जीवन प्रवास :
1972मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1976ला त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपदही भूषवलं. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.

बूम बूम बुमराह…. भारत विजयापासून 1 पाऊल दूर