गुरमीत राम रहिम समर्थकांची अनेक ठिकाणी निदर्शने

चंदीगड : डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांच्याविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या खटल्याचा निकाल आज दुपारी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डेरा समर्थकांनी पंचकुला येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. काही समर्थक रस्त्यावर झोपून निषेध व्यक्त करत होते.

राम रहिम सिंग यांना न्यायालयात नेत असतांना नरवाना येथे पोलिसांच्या तीन वाहनांना अपघात झाला . या अपघातात कोणीही जखमी झाले नाही,अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. राम रहिम यांना नेत असतांना अंबाला येथे रस्त्यावर त्यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचेही सांगण्यात आले आहे.