सलमानच्या हत्येचा कट उधळा; आरोपीला अटक

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबादमधील गँगस्टर लाॅरेंस बिश्नोईच्या खास संपत नेहराला अटक केलीये. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी मागण्याचे 24 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

Loading...

सलमान खान काळवीट शिकार प्रकरणातील आरोपी आहे. आणि म्हणूनच त्याच्या हत्येचा कट लाॅरेंस बिश्नोईने रचला असल्याची माहिती समोर आलीये. अटकेनंतर एसटीएफने केलेल्या चौकशीत सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता आणि यासाठी मुंबईतील त्याच्या घराची रेकी केली होती अशी कबुली संपत नेहराने दिली आहे.

त्याने दिलेल्या माहितीनुसार नेहराने मुंबईतील वांद्रे येथील सलमानच्या घराची दोन दिवस रेकी केली होती. कट कोणत्या परिस्थितीत अयशस्वी होऊ नये यासाठी त्याने सलमान घरातून किती वाजता बाहेर येतो आणि सुरक्षारक्षकांची माहितीही गोळा केली होती. सलमानचा चाहता असल्याचं भासवून तो त्याची हत्या करणार होता असंही त्याने सांगितले आहे.

एसटीएफला संपत नेहराच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, लाॅरेंस बिश्नोईने तुरुंगात बसून सलमानच्या हत्येचा कट रचला होता. सलमानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवण्यात आली होती. बिश्नोईची संपत नेहराची ओळख तुरुंगातच झाली होती. त्यानंतर संपत नेहरा बिश्नोईच्या गँगमध्ये सामील झाला. संपत हा चंडीगढ विद्यापीठात असताना बिश्नोईच्या संपर्काता आला होता.Loading…


Loading…

Loading...