‘बाहुबली ब्रेन सर्जरी’- ब्रेन सर्जरी दरम्यान चक्क पेशंट पाहत होता चित्रपट

बाहुबली चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. प्रेक्षकांनी देखील चित्रपटाला भरभरू प्रतिसाद दिला. बाहुबली चित्रपटाने एका पेशंटचे प्राण देखील वाचविले आहेत.
आंध्रप्रदेश येथील ४३ वर्षीय विनया कुमारी एका हॉस्पिटल मध्ये नर्सचे काम करीत होत्या. एक दिवस अचानक त्यानां चक्कर आली. काही तपासण्या केल्यानंतर विनया कुमारी यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे समोर आले.
ब्रेन ट्युमरसाठी एक जटील सर्जरी करावी लागणार होती. पण ती सर्जरी करत असताना पेशंट शुद्धीत असणे गरजेचे होते. याकरता डॉक्टराने एक मार्ग शोधून काढला. पेशंटला लॅपटॉपवर बाहुबली चित्रपट लावून देण्यात आला.व सर्जरी करण्यात आली.
डॉक्टर श्रीनिवास यांनीही सर्जरी केली असून त्यांना याविषयी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की सर्जरी दरम्यान पेशंट शुद्धीत असणे गरजेचे आहे.याकरता आम्ही पेशंटला बाहुबली चित्रपट दाखवत सर्जरी केली. यामुळे पेशंट देखील घाबरला नाही. त्यामुळे या सर्जरीला ‘बाहुबली ब्रेन सर्जरी’ म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...