जनतेच्या हितासाठी गुंठेवारीचा निर्णय- एकनाथ शिंदे

जनतेच्या हितासाठी गुंठेवारीचा निर्णय- एकनाथ शिंदे

eknath shinde

औरंगाबाद : गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांना त्यांची घरे किंवा मालमत्ता नियमित नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आग्रही भूमिकेमुळे गुंठेवारी नियमितीकरणाचा निर्णय घेण्यात आला. रेडीरेकनरच्या ५० टक्के शुल्क आकारून मालमत्ता नियमित करण्यात येत आहेत. त्यात नागरिकांचा फायदाच आहे राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

जनतेने आपल्या मालमत्ता लवकरात लवकर मुदतीच्या आत नियमित करून घ्याव्यात असे आवाहन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केले. शिवसेनेच्या वतीने शहरात तीन दिवसीय गुंठेवारी नियमितीकरण मार्गदर्शन शिबिर आयोजित केले असून या शिबिरास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या मालमत्ता नियमितीकरण शिबिरामुळे महानगरपालिकेचे अधिकारी, आर्किटेक एजन्सी यांच्या सहकार्याने ज्या नागरिकांच्या मालमत्ता नियमित झाल्या अशा नागरिकांना प्रमाणपत्र एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. बुधवारी एकूण १८ नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, शहर अभियंता एस.डी पानझडे मेहनत घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या