औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षावर तिखट शब्दात टीका केली आहे. यावेळी सदावर्ते म्हणाले कि, “काँग्रेस पक्षाची मानसिकता टार्गेट पद्धतीची आहे. महिलांप्रती जातीय द्वेष निर्माण केला जात आहे. मग त्या नुपुर शर्मा असतील किंवा भारताच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू असतील. काँग्रेसच्या नेत्यांनी मुर्मू यांना जातीय दृष्टिकोनातून हिनवले आहे. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मला गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे करार आठवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसची जातीय मानसिकता माहीत होती म्हणून ते पुणे कराराविरुद्ध बोलले होते.”, या शब्दात त्यांनी काँग्रेसवर निशाण साधला.
पुढे सदावर्ते असेही म्हणाले कि, “राष्ट्रपतीपदाला समाज म्हणून पाहिलं जायला नको, मी असं मानणार आहे. द्रौपदी मुर्मू ज्या एक कर्तुत्ववान महिला उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसने अशा वायफळ वल्गना करणे अत्यंत दुखद आहे आणि म्हणूनच मी काँग्रेसची आणि त्यांच्या जातीय विचारांची निंदा करतो. तसेच मुर्मू यांच्यावर टिपण्णी करणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे आणि तो गुन्हा दाखल व्हावा”, अशी मागणी त्यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. तसेच असदुद्दीन ओवैसी या प्रकरणावर कधी बोलणार आहेत, याची सुद्धा मी वाट पाहत आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Chhagan Bhujbal | काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओक्के ; भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
- Eknath Khadse : “१५ दिवस झाले तरी हे सरकार अजूनही जेवणावळीतच व्यस्त”; एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारवर निशाणा
- Mahesh Tapase:राज्य अतिथीगृहात कार्यक्रम घेतल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा – महेश तपासे
- Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक – गोपीचंद पडळकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<