मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आणखी 15 दिवसाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. आज कोर्टात एसटीप्रकरणावर सुनावणी झाली आहे. राज्यसरकारकडून अद्याप एसटीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाला दिली आहे. दोन्ही बाजूची मागणी ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर येत्या 5 एप्रिल रोजी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
“एसटी बंद असल्यामुळे कोकणात परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या संबंधातील अनेक खासगी गाड्या लावल्या. त्यामुळे इथे नुकसान फक्त कष्टकऱ्यांचं होत आहे. मात्र खासगी गाड्या लावून फायदा स्वतःचा होत आहे, हे आम्ही न्यायालयाला सांगितलं आहे”, अशी माहिती सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या: