गुणरत्न सदवार्तेंचा तोल घसरला, मराठा समजाला म्हणाले माजुरे…

gunratn sadavarte

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. शिवाय आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाचा या निकालाने मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. त्यांनतर आता 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

केंद्र सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका टाकणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. ‘पुनर्विचार याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाच्या संहितेमध्ये एरर पुरता स्कोप आहे. सर्वोच्च न्यायलयात ९६.६ टक्के केसेस रद्द होतात असे सदावर्ते यांनी म्हंटले आहे. दरम्यान, आरक्षण तर टिकणारच नाही पण न्यायालयात एकाही मराठा वकिलाला बोलू दिले नाही हे खरं मराठा समाजाचे मागासलेपण असल्याचं सदावर्ते म्हणाले आहेत.

एका फेसबुक लाईव्ह चर्चेदरम्यान हे गुणरत्न सदावर्ते आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील चांगलेच भिडलेले पाहायला मिळाले. मराठा समाजातील कारखानदार, आमदार, खासदार यांना आम्ही आरक्षण मागतच नाही, ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त आहे अशांना बाजूला फेका असे सांगणारा मराठा समाज एकमेव आहे, असे विनोद पाटील यांनी छ्तीठोक पणे सांगितले. यावरून गुणरत्न सदावर्ते यांचा चांगलाच तिळपापड झाला.

त्यानंतर मात्र गुणरत्न सदावर्ते यांचा तोल सुटला आणि अशापद्धतीने छातीठोकपणे बोलणे हा माजुरेपणा असल्याचे सदावर्ते म्हणाले आहे. मराठा समाजाच्या या माजुरेपणाचे लक्षण म्हणजे आपण उच्चभ्रू आहोत आपण सत्ता गाजवू शकतो हे आहे. हा माजुरेपणा आहे आणि म्हणूनच आरक्षण मिळू शकत नाही असं देखील पुढे सदावर्ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत बराच उहापोह झाला होता. खंडपीठाने हे अधिकार आता राज्यांना उरले नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यांनतर 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP