पवारांचं ‘कलरफुल’ राजकारण; गुणरत्न सदावर्तेंची टीका

पवारांचं ‘कलरफुल’ राजकारण; गुणरत्न सदावर्तेंची टीका

Gunratrn Sadawarte And Sharad Pawar

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कामगारांनी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab)यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कामगारांच्या (st bus workers)पगारवाढीची (salary increased) घोषणा केली आहे.

राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचे अखेर गुरुवारी स्पष्ट झाले. मुंबईतल्या आझाद मैदानातून आंदोलनातून अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे.

9 जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत 2 आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. यावेळी कामगार शिष्टमंडळाला कोंडून ठेवले, असा आरोप गुरुवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

राज्यव्यापी एस. टी. संप विलीनीकरणासाठी सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. ‘एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबद्दल राज्यातील 250 डेपोतील कर्मचाऱ्यांनी दुखवटा पाळला. मात्र, याचा कळवळा खासदार सुप्रिया सुळेना आला नाहीपवारांचे कलरफुल राजकारण आहे. त्यांनी संपकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कालच्या परीक्षेत नापास झाले आहेत’, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

आंदोलकांना पाठिंबा असेल. आमची भूमिक वेगळी आहे. आंदोलन पुढे कसे न्यायचे, त्याची रणनीती सारे काही वेगळे असते म्हणत तलवार म्यान करण्याचे संकेत दिले. त्यानंतर तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.

महत्वाच्या बातम्या: