जळगाव भाजपच्या पोस्टरवर शिवसेना नेत्यानंतर एकनाथ खडसेंना जागा

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांनी आजचा जळगाव दौरा अचानक रद्द केला आहे , एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली जात आहे. त्याचबरोबर आता जळगाव शहरात भाजपच्या वतीने वर्धापनदिन आणि मुख्यमंत्री यांचे अभिनंदन यासाठी बॅनर लागलेत. त्यात इतर भाजप नेत्यांसोबत शिवसेनेचे उपनेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचाही फोटो लावण्यात आला आहे मात्र, धक्कादायक बाब म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र गुलाबराव पाटील यांच्या नंतर जागा मिळाली आहे. त्यामुळे भाजपमधील दुफळी प्रकर्षाने समोर आली आहे.

तर हे नजरचुकीनं झालंय. मला हा प्रकार आताच कळला आहे. याबाबत भाजप जिल्हा अध्यक्षांना जाब विचारणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Loading...

दरम्यान, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आयोजित पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण समारंभ जैन हिल्स येथे आकाश मैदानात आज ( शुक्रवार ३० मार्च ) रोजी होता याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते तर अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार हे होते याच मंचावर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित राहणार होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार