Share

Gulabrao Patil | ‘वंदे मातरम’च्या निर्णयावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने (State Government) एक नवीन आभियान राबण्याचा निर्णय घेतला असून, आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) या शब्दांनी अभिवादन करावे लागणार आहे. सरकारच्या याच निर्णयावर शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील ?

देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. आज भुसावळ तालुक्यातील कंडारी, फुलगाव, कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या 13 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या मातीत तुम्ही राहता, त्या मातीला तुम्ही नमन केले पाहिजे. देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल. वंदे मातरम म्हणणे काही चुकीचे नाही. तसेच महाराष्ट्रातील जवळपास 17 हजार गावं आहेत. त्या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या बीपीआर मंजूर करून त्यांना मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे बोलतना पाटील असंही म्हणाले, 2024 पर्यंत महाराष्ट्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. हे धोरण ठरलेलं आहे, त्या धोरणाप्रमाणे पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे.

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) या शब्दांनी अभिवादन करावे लागणार असल्याची याची माहिती राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudir Mungantiwar) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. परंतू काल शनिवारी याचा सरकारी अध्यादेश (जीआर) काढण्यात आला आहे. तर यासंदर्भातील नियमही सरकारकडून जाहीर करण्यात आले असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने (State Government) एक नवीन …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics