Share

Gulabrao Patil | “… म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला”, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

Gulabrao Patil | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल अखेर काल जाहीर झाला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. यावर एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी, ज्या दिवशी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली होती, त्याच दिवशी लटकेंचा विजय निश्चित झाला होता. सर्व पक्षांनी ऋतुजा लटकेंना पाठिंबा दिला होता, त्यामुळे साहजिकच त्यांचा विजय निश्चित होता, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

यापुर्वी, गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो तेव्हा राष्ट्रवादीने भाजपसोबत शपथ घेतली होती. कदाचित एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपबरोबर जाताना दिसली असती, असे गुलाबराव पाटील म्हणाले. शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी दावा केला आहे की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे, यावर गुलाबराव पाटील बोलत होते.

गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराचा पहिला दिवस संपन्न झाला. शिर्डी येथे हे शिबिर सुरु आहेत. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे गटावर टीका करत आहेत. या शिबिरानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असा दावा करण्यात येत आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अधिवेशन संपले. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जातात”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Gulabrao Patil | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल अखेर काल जाहीर झाला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now