मुंबई : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेही गुवाहाटीला पोहोचले आहेत. आता जळगाव जिल्ह्यातील चारही आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. आता महाविकास आघाडी सरकारच काय होणार हा मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शासकीय वर्षा निवास्थान सोडले आहे.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल येत आहेत. कालपासून शिवसेनेच्या अनेक मंत्री आणि आमदार शिंदे गटात सामील होण्याची चर्चा होती. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटात गुलाबराव पाटील सामील झाले आहेत. भाजपसोबत जाण्याचा मुख्यमंत्र्यांना पाटील यांनी सल्ला दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी निर्णय न घेतल्याने पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाश शिंदे गुहावटीत ज्या हॉटेमध्ये थांबले आहेत. त्या हॉटेमध्ये पाटील पोहचले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पाय धरले आणि नमस्कार केला. त्यामुळे राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे यांचे मन वळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसला
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांच्या गटासह सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये बराच वेळ मुक्काम केला. शिवसेनेकडून बंडखोर शिंदे यांच्याशी समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल दिवसभर नाट्यमय घटना घडल्या. शिंदे यांनी दबावाखाली काही आमदारांना सुरतला नेल्याचा आरोप करण्यात आला. अनेकांचे मन वळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसला. एकनाथ शिंदे आपल्या निर्णयावर ठाम असून आता सुरतहून एकनाथ शिंदे यांची फौज गुवाहाटी येथील रॅडिसन हॉटेलवर पोहोचली आहे. दरम्यान, शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :