Share

Gulabrao Patil | “चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर…”; गुलाबराव पाटलांची खदखद

जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या जम्बो कॅबिनेटचा तब्बल ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यांनतर काही दिवसातच खातेवाटप करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खाते वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे या खाते वाटपात भाजपचे वर्चस्व दिसून आले. त्यामुळे शिंदे गटातील गुलाबराव पाटील नाराज झाल्याचं दिसून येतं आहे.

काही नेत्यांना जुनीच खाती परत देण्यात आली आहेत तर काहींना नवीन खाती दिली आहेत. मात्र नाराज नेते आपली खंत उघडपणे बोलून दाखवताना दिसत आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्रीपद शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना देण्यात आलंय. मात्र ते या बाबतीत नाराज असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे.

काहींनी आपल्या मनातील नाराजी बोलून दाखवली आहे. चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर चांगलं मंत्रिपद मिळालं असतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. गावात सुरु केलेल्या योजनेविषयी ते म्हणाले, पुढच्या वेळेस गावातील लोकं मला मतदान करतील कि नाही याबद्दल शंका आहे.

यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहेत. काही लोक आमच्या मधे मधे करतात. ज्यांना ठराव सुद्धा माहित नसतो ते योजना मंजूर करून आणली असं सांगतात. म्हणजे आम्ही बाळ जन्माला घालायचं आणि तुम्ही बारसं करायचं असा धंदा यांचा असल्याची बोचरी टीका पाटलांनी विरोधकांवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :

जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या जम्बो कॅबिनेटचा तब्बल ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now