Share

Gulabrao Patil | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादात गुलाबराव पाटलांची उडी, म्हणाले…

Gulabrao Patil | मुंबई : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात वाद पेटलेला आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी खोके घेतले, असा आरोप रवी राणांनी केला होता. यावरुन वाद चांगलाच वाद पेटला असून या वादात गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उडी घेतली आहे.

यादरम्यान, राज्यात अफवांच पिक चालू झाल आहे. माझं आव्हान आहे की, तुमचं अडीच वर्षाचं काम आणि आमचं 90 दिवसाची तुलना करू तुम्ही वरचढ ठरलात तर हे सरकार खुर्ची खाली करेल, असं म्हणत तुमचा अमरावती जिल्ह्यातील वाद आहे. तुमच्या स्थानिक वादामुळे राज्यातील 40 आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

आताचे मुख्यमंत्री हात दाखवा आणि गाडी थांबा असे मुख्यमंत्री असून काही लोक आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना कामातून उत्तर देणार, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

रवी राणा यांनी आरोप करताना भान बाळगलं पाहिजे. जर आम्ही खोके घेतले तर दिले कुणी असा प्रश्नही उपस्थित होतो. त्याचंही उत्तर रवी राणा यांनी द्याव, असं बच्चु कडू म्हणालेत. तसंच राणा यांनी जे आरोप केलेत ते माझ्या एकट्यावर नाहीत, तर ते सर्व शिंदे समर्थक आमदारांवर आहे. त्यामुळे या आरोपांचा खुलासा व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या :

Gulabrao Patil | मुंबई : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात वाद पेटलेला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now