वनविभागाने वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, गुलाबराव पाटील कोलते यांची मागणी

heavy rain

औरंगाबाद :  सावळदबारा परिसरात खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करत आहेत. सावळदबारा परिसरातील ठिकठिकाणीच्या शिवारातील कपाशी,मका.सोयाबीन पिकांचे रोही व वन्य प्राणी नुकसान करत आहेत पिकांची नासाडी होत असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे वन विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उप तालुकाप्रमुख गुलाबराव पाटील कोलते व परिसरातील शेतकरी करित आहेत.

सावळदबारा हा डोंगर भाग असल्यामुळे हरिण, बिबट्या, राननडुक्कर, रोही आदी वन्य प्राणी आहेत. वन्य प्राणी हे रात्री सुमारास येऊन कपाशी, मका, सोयाबीन ही कवळी पिके खाऊन घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राखन करण्यासाठी शेतात जावे लागत आहेत शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी.सोयाबीन पिकांची लागवड केली आहेत सावळदबारा परिसरात जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु नंतर पाऊस नसल्याने पिके सुकून गेली काहींनी पाणी देऊन पिके जगवली तर काहींना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यात आता हे वन्य प्राणी शेतात येऊन कवळे पिकांचे शेंडे खाऊन घेत आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन राखण करत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. नंतर पाऊस न पडल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे.

टिटवी,मूर्ती.घाणेगाव,मोलखेडा,देव्हारी,नांदाताडां,पिपळवाडी,हिवरी,नांदागाव,रवळा,जवळा,जामठी,महालब्धा,डाभा.आदी भाग डोंगर असल्यामुळे येथे रात्री च्या सुमारास डोंगर जवळील शेतात रोही च्या टोळी शेतात येऊन नुकसान करून जाते.  वन विभागाने परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उप तालुकाप्रमुख गुलाबराव पाटील कोलते,सावळदबारा परिसरातील शेतकरी करित आहे.

महत्त्वाच्या बातम्या