Share

Gulabrao Patil | “आई जगदंबे, जो जो आम्हाला आडवा येईल, त्याचा…”, भरसभेत गुलाबराव पाटील संतापले

Gulabrao Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज नंदुरबार येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी बंड मध्ये सहभागी असलेल्या आमदारांबाबत स्पष्टीकरण दिलं. तर दुसरीकरडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी विरोधकांना थेट दमच दिल्याचं दिसत आहे.

रिक्षावाले, टपरीवाले, बँडवाले यांचं हे पथक असलेलं हे सर्वसाधारण सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काय लागतं हे सरकार जाणतं, शिंदे यांचे आभार मानतो. ते बाहेर निघाले, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

आई जगंदबा तुम्हाला आणि शिंदे साहेबांना उदंड आयुष्य देवो, बलदंड शक्ती देवो, जो जो आम्हाला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो, असा संताप पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच बापने नही देखी गोधडी आणि सपने मे आ गयी खाट, असं विरोधकांचं झालं आहे. सर्वसाधारण माणसात फिरणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची प्रतिमा आहे. याचं मूळ कारण म्हणजे सोन्याचा चमच्या घेतलेल्या माणसाच्या घरी आम्ही जन्माला आलो नाही, असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान, 40 आमदार, 10 अपक्ष आमदार यांनी एका भावनेपोटी, राज्याच्या विकासासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता. त्यामुळे इथे पैशांचा कुठेही विषय येत नाही, येणारही नाही. माझ्यासोबत सर्व आमदार मनापासून आले. पैशांचं कुठेही देणंघेणं झालं नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Gulabrao Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज नंदुरबार येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी बंड …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now