Share

Gulabrao Patil | “50 आमदार एकदम ओक्के, घरी…”; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्ला

Gulabrao Patil | नंदुरबार :  नंदुरबारमध्ये (Nandurbar) नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याठिकाणी शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. ’50 आमदार एकदम ओक्के, घरी बसवले माजलेले बोके’, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

50 आमदार एकदम ओक्के, घरी बसवले माजलेले बोके. इथे आम्ही अनेक शाखांचं उद्घाटन केलं. कलम 307, 302, 151, 107, 110 काय असतात ते आम्हाला माहिती. आम्ही अंगावर शंभर केसेस घेऊन या संघटनेत काम केलं. अरे एसीच्या पठ्ठ्यांनो, मायच्या लाल्यांनो तुमच्यावर किती केसेस आहेत ते आधी सांगा. पुढे बोलताना ते म्हणाले की, गणेशोत्सव आला की पोलीस, शिवजंयती आली की पोलीस, नवरात्रोत्सव आला की पोलीस. पण जमाना बदल गया है. जे पोलीस आम्हाला शोधायचे तेच पोलीस आता मागेपुढे असतात. आगे गाडी, पिछे गाडी, बिच में बैठा गुलाब गडी.

आमच्यावर विरोधकांनी अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले 50 खोक्के, एकदम ओक्के! पण पश्चिम बंगालला रेड पडली, 27 कोटी रुपये सापडले. 27 कोटी रुपये आणायला एक टेम्पो लागला. आता आम्ही 40 फुटलो. सत्तार साहेब तुम्ही नोटा घेऊन जाण्यासाठी कोणता टेम्पो घेऊन आला होता ते जरा सांगा. आमच्यावर आरोप करता? आम्ही 35 वर्ष आयुष्य शिवसेनेत घातलं. या नंदुरबारच्या खेडा-पाड्यात, धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक गावात शाळा उघडणारा हा गुलाबराव पाटील आहे.

तसेच, शि म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, स म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे जिथे नामर्दांना स्थान नाही ती मर्दांची संघटना सांगणारा हा गुलाबराव पाटील आहे. खेड्या-पाड्यांमध्ये जाऊन आम्ही शिवसेना उभी केली. मुंबईचे चापुलसी करणारे लोकं म्हणतात की, आम्ही शिवसेनेसोबत गद्दारी केली. आम्ही गद्दारी केली नाही तर शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे काम केलं असल्याचं पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Gulabrao Patil | नंदुरबार :  नंदुरबारमध्ये (Nandurbar) नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now