Gulabrao Patil | “एकच पिक्चर बघून लोक बोअर झालीत, दुसरं काहीतरी वेगळं करा” गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Gulabrao Patil | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांवर सडकून टीकांचं सत्र सुरु आहे. ‘गद्दारांनो हिम्मत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा’ अशा पद्धतीचे खुलं आव्हान देत आहे. त्यावरच मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

“एकच पिक्चर बघून लोक बोअर झाली”

“सात महिने झाले एकच पिक्चर सुरू आहे. लोक आता बोअर झाली आहे, काहीतरी वेगळं करा. आत्ता जो पक्ष राहिला आहे, त्या पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा” असा सल्ला गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

Gulabrao Patil criticize Aaditya Thackeray

“आदित्य ठाकरे यांना जे मिळालं आहे त्यातून पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी त्यांचे लोकं निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे, आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करावा असेही पाटील म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांना काही गोष्टीचा साक्षात्कार झाला असेल तर त्याला अर्थ नाही”. शेवटी निवडून येण्याला महत्व आहे”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ‘मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीत येऊन निवडणूक लढवावी’ असे आव्हान दिले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट ठाण्यात येऊन निवडणूक लढवतो म्हणत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले होते.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.