Share

Gulabrao Patil | “खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी…”, गुलाबराव पाटलांचा पलटवार

Gulabrao Patil | मुंबई : जळगाव शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप देखील खडसे यांनी अप्रतियक्षरित्या गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर केला. शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर केला होता. यालाच आता गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आजपर्यंत खडसेंनी काहीच केलं नाही, म्हणून मी शहरासाठी काहीतरी करतोय हे खडसेंना दाखवायचं आहे. खडसे पालकमंत्री असताना डीपीडीसीमधून त्यांनी शहरासाठी किती पैसे दिले?, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

यादरम्यान, गिरीश महाजन यांनी देखील खडसेंना इशारा दिला आहे. एकनाथ खडसेंना भरपूर वेळ असल्याने ते इकडे तिकडे फिरत राहतात. मात्र त्यांचेही कारणामे लवकरच समोर येतील, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे. तसेच रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुन्हा एकदा खडसे-पाटील आणि महाजन यांच्यात ठिणगी पडली आहे.

जळगावच्या राजकारणाविषयी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. जळगाव जिल्ह्यातील संस्था विरोधकांनी म्हणजेच भाजपने डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊनी त्या नीटनेटक्या करायच्या. हे आतापर्यंतचं उदाहरण आहे असं म्हणत खडसेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

Gulabrao Patil | मुंबई : जळगाव शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now