डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी – गुलाबराव पाटील

जळगाव: गाव, शहर व मानव कल्याणच्या विकासासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून दिपस्तंभसारखे महान आहे. सद्गुरूंच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होते. नानासाहेबांच्या शिकवणीने मनुष्यास देवत्व प्राप्त होऊन त्यांच्या सानिध्यातून मानवाच्या जीवनात परिवर्तन घडते. शिस्त, समर्पन व निस्वार्थी सेवा ही समर्थ बैठकीची व्यापक भूमिका आहे. नानासाहेबाच्या प्रतिमेमुळे आम्हाला निस्वार्थी सेवेची प्रेरणा मिळत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथे ग्रामपंचायत कार्यालय व संपर्क कार्यालयात नानासाहेबाच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...