Gulabrao Patil | मुंबई : एकनाथ खडसे यांनी खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती.
गुलाबराव पाटील यांचा पलटवार –
कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात. जे होत आहे ते पाहावं. अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे, असा पलटवार गुलाबराव पाटलांनी केला आहे.
गिरीश महाजन यांचे अनेकांसोबत चांगले संबंध असल्याने त्यांना रात्री बेरात्री अनेक जण भेटायला येतात, त्यांना ते एकांतात भेटतात, त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित महाजन यांनी सुरक्षा नाकारली असेल, अशी बोचरी टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.
राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यावर देखील गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान, आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल, असं राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
ठाकरे यांचं पत्र –
माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल, असं देखील ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shrikant Shinde | राज ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Khadse | “… म्हणून गिरीश महाजनांनी सुरक्षा नाकारली”, एकनाथ खडसेंचा घणाघात
- Sharad Pawar । रमेश केरे यांनी मागील १० ते १५ दिवसांपूर्वी मला मेसेज केले; शरद पवारांचा मोठा खुलासा
- Raj Thackeray | “महाराष्ट्राची सत्ता हातात आली तर…”, राज ठाकरेंनी महाराजांची शपथ घेत सांगितला नवीन महाराष्ट्र
- Ramdas Athavle | “राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही, कारण…”; रामदास आठवलेंची राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया