Shivsena । जळगाव : सध्या राज्यभर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर बंडखोर आमदार आहेत. मात्र या निष्ठा यात्रेवरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे. यासारखा आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. तर पाटलांच्या या टीकेनंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय.
यावर आता शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले कि, गेल्या दोन वर्षांपासून कोविडमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांभाळल आहे त्याची दखल पूर्ण देशाने सुद्धा घेतलेली आहे. त्यावेळेला गुलाबराव पाटील यांनीच अनेक वेळा त्यांच्या संपूर्ण भाषणात सांगितले कि देशात सतत पाच वेळा एक नंबर येणाऱ्या मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचा आहे. यांची भाषणे तपासून बघा. मात्र सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला गेल्यामुळे त्यांचा स्मृतिभ्रंश झालाय. त्यांनी अगोदर काय सांगितले आणि आता काय सांगत आहेत याचे त्यांना भान राहिलेले नाही.
दरम्यान, याआधी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती. तसेच आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमचा राजीनामा घेण्याचा विषयच येत नाही. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही. आम्ही भगवा सोडलेला नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनेचेच काम करत आहोत, असंही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray : शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु – राज ठाकरे
- Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Shinde Government : हे सरकार शेतकऱ्यांसाठी अपयशी ठरतय का? २४ दिवसांत ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
- Eknath Shinde | आम्ही बाळासाहेबांना आवडणारी भूमिका घेतली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय शिवचरित्रावर दुसऱ्या कोणी केला नाही – शरद पवार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<