शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम; कॉंग्रेसमध्ये प्रवेश

congress & ncp

वेबटीम- ऑगस्ट महिन्यात गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकांचे पडसाद आता उमटू लागले आहे.या निवडणुकांत गुजरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली होती. यामुळे नाराज असलेल्या 500 पेक्षा अधिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी आणि कॉंग्रेस राज्य प्रभारी अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचटया कार्यकर्त्यानी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी कॉंग्रेसचे दरवाजे खुले असल्याच सोलंकी यांनी स्पष्ट केल, तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने वापरलेली लोकशाही विरोधी पद्धती धडकी भरवणारी आहे. राज्यसभा निवडणुकांच्या वेळी भाजपकडून करण्यात आलेल्या घोडेबाजारामुळे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी केली.

मात्र राष्ट्रवादीने संबधित कार्यकर्ते आणि काही पदाधिकाऱ्यांना याआधीच पक्षातून निलंबित केल्याच सांगितल असून त्याच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे सांगितले आहे.