गुजरातमध्ये गायींना वाचविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जमावाकडून माराहाण

अहमदाबाद : गोध्रा येथे कत्तलखान्यात नेत असलेल्या गायींना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर १०० हून अधिक जणांनी हल्ला केला. जेथे गायींना ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी पोहोचल्यावर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक व्ही.के. नाई यांनी दिली. गायींना कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती सुरक्षा दलाना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाने या परिसराला घेराव घातला. गायींना बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी जेव्हा गायींना तेथून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहितीही नाई यांनी दिली.