हार्दिक पटेलला भाजपचा धोबीपछाड , हार्दिकचा माजी सहकारी चिराग पटेलचा भाजपमध्ये प्रवेश

nitin-patel1

अहमदाबाद :. हार्दिक पटेलसोबत राजद्रोहाच्या आरोपाचा सामना करावा लागत असलेला पाटीदार समाजाचा दुसरानेता चिराग पटेल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे . हा हार्दिक पटेलसाठी मोठा धक्का मानला जात आहे.त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात समावेश केला.भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चिराग यांनी खाजगी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाटीदार आरक्षण आंदोलनावर हार्दिकने कब्जा केल्याचा आरोप केलाय.

ते म्हणाले की, ‘पाटीदार समुदायाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता एका व्यक्तीच्या खाजगी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं माध्यम बनलं आहे. हे आंदोलन धन आणि सत्ता मिळवण्याचं एक माध्यम झालं आहे. मला वाटतं आंदोलन चुकीच्या दिशेने जाणार आहे’.याआधी भाजपने पाटीदार समाजाचे दोन नेता रेशमा पटेल आणि वरूण पटेल यांनाही पक्षात खेचले. भाजपमध्ये सहभागी झाल्यावर रेशमा पटेल म्हणाल्या की, आमची लढाई समाजाला न्याय मिळवून देण्याची होती, कॉंग्रेसला जिंकवण्याची नाही. भाजपने आमच्या तीन मागण्या पूर्ण केल्या आहेत’.