हार्दिक पटेल यांचा गुजरातमध्ये कॉंग्रेसला पाठींबा

rahul-hardik,rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा :गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दिले आहेत. हार्दिक पटेल यांना उमेदवारी देण्याची तयारीही काँग्रेसने दर्शवली होती परंतु हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.आगामी निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना नुकतीच काँग्रेसने ऑफर दिली होती. पाटीदार समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान भेट घेणार आहे. या भेटीत राहुल गांधींही आमच्या मागण्या मान्य करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या भेटीनंतरच पाठिंब्याबाबत अधिकृत घोषणा करु, असे त्यांनी सांगितले.