बुलेट ट्रेनला विरोध करणा-यांनी बैलगाडीने प्रवास करावा-मोदी

'काँग्रेस सरकारलाही हा प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, पण अयशस्वी ठरले. म्हणून आता विरोध करत आहेत'

भरुच (गुजरात): काँग्रेसने अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टला आपला विरोध दर्शविल्यानंतर बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करणा-यांनी बैलगाडीने प्रवास करावा असा खोचक सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसला दिला आहे.गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तिरावर अमोद साखर कारखान्याजवळ पार पडलेल्या रॅलीत बोलताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली.

‘या प्रोजेक्टमुळे गुजरातमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. किती रोजगार उभे राहतील याचा विचार करा. बुलेट ट्रेनसाठी सिमेंट कुठून खरेदी होणार ? लोखंड कुठून येणार ? कामगार कुठले असणार ? हे सगळं भारतातूनच मिळणार ना ? आणि हे सर्व कोण विकत घेणार ? जपान. ही मोठी संधी नाही का ? ‘, असे सवाल देखील नरेंद्र मोदींनी उपस्थित केला ‘मनमोहन सिंग यांचं सरकार असताना युपीएला हा प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, पण ते करु शकले नाहीत. एनडीए सरकारने अत्यंत कमी किंमतीत हा प्रोजेक्ट आणला होता. काँग्रेसला हे आवडलेलं नाही. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की, जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवू शकला नाहीत, तर ती दुस-या मिळवली म्हणून तुम्हाला एवढा त्रास का होतो’, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

You might also like
Comments
Loading...