गुजरातमध्ये कोण मारणार बाजी; ओपिनियन पोल काय सांगतो ?

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमध्ये १५ टक्क्यांनी घट

संपूर्ण देशाचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. तर दुसरीकडे भाजपचा गड असणाऱ्या गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीं यांनी प्रचाराचा झंजावात सुरु केला आहे. कॉंग्रेसला हार्दिक पटेल आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांची साथ मिळत असल्याने भाजपची कोंडी झाली असल्याच दिसत आहे.

bagdure

भाजपला कडवा विरोध होत असला तरी गुजरातमध्ये पुन्हा एकदा कमळच फुलण्याची शक्यता आहे. लोकनिती आणि सीएसडीएस या संस्थांनी गुजरात निवडणुकांचा ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये भाजपला ११३ ते १२१, काँग्रेसला ५८ ते ६४ जागांवर, तर १ ते ७ अपक्ष उमेदवार निवडून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान भाजपसाठी ही आनंदाची बातमी असली तरी पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमध्ये १५ टक्क्यांनी घट झाल्याच दिसत आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...