गुजरातमध्ये भाजप आघाडीवर ; राहुल गांधीचा करिष्मा देखील चालला

rahul gandhi vs narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय होणार असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तविला होता अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी तर भाजपला १५० पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला होता. पण सुरवातीचे कल हाती आली तेव्हा भाजप १०८ आणि कॉंग्रेस १३ जागांवर पुढे होते. हे सुरवातीचे कल पाहता गुजरात मध्ये भाजप निसटता विजय मिळवत असल्याच स्पष्ट झाल आहे. या गुजरात निवडणुकीत कॉंग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांची बरीच चर्चा झाली त्यांच्यातील नेता अधिक प्रगल्भ झाल्याच बोलल जाऊ लागल आणि तस या निकालामध्ये सुद्धा दिसत आहे. निवडणुकांपूर्वी गुजरात मध्ये कुठेही न दिसणारी कॉंग्रेस राहुल गांधींच्या करिष्म्याने आपले अस्तित्व सिद्ध करू शकली आहे.

महाराष्ट्रात सुद्धा पडसाद

गुजरात निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “१५०च्या आकड्याच काय झालं? जनतेला गृहीत धरू नका, जनतेच्या मनात काय आहे हे आपण म्हणू ती पूर्व दिशा हे जनता एकूण घेत नाही, या निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळालं आहे.” अस मत व्यक्त केलय तर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी “राहुल गांधींनी गुजरातमध्ये जे काम केलंय ते पाहता गुजरातमध्ये भाजपने पराभव स्विकारला पाहिजे” अस वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.