बिगूल वाजले;गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान 

गुजरातच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष

महाराष्ट्र देशा टीम: संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुका अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत.  9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान या निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठान पणाला लागणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा लांबणीवर पडत असल्याने विरोधकांकडून मोदी आणि अमित शहा यांनी टार्गेट केलं जातं होत. तर तारखा जाहीर होण्याआधीच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौरा करत वातावरण ढवळून टाकले आहे. तसेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून गुजरातमध्ये पहिलीच निवडणूक असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

You might also like
Comments
Loading...