गुजरात दंगल: नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणात भाजपाच्या माजी नेत्या माया कोडनानी निर्दोषमुक्त

maya kodnani and babu bajrangi

टीम महाराष्ट्र देशा: २००२ साली गुजरातमध्ये घडलेल्या बहुचर्चित नरोदा पाटीया हत्याकांड प्रकरणात भाजपच्या माजी नेत्या आणि गुजरातमधील माजी मंत्री माया कोड्नानी यांना दिलासा मिळाला आहे. गुजरात उच्च ब्यायालयाने या प्रकरणात आज निकाल दिला असून कोड्नानी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर बाबू बजरंगीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे बाबू बजरंगीला आजन्म कारावास भोगावा लागणार आहे. बाबू बजरंगी बरोबरच दुसरे आरोपी हरेश छारा, सुरेश लंगडा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे.

२००२ साली गोधा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. यामध्ये अहमदबादजवळील नरोदा पाटीया हत्याकांडात तब्बल 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ऑगस्ट २०१२ मध्ये माया कोड्नानी तसेच बाबू बजरंगीसह ३२ जणांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यामध्ये कोड्नानी यांना २८ वर्षाची तर बाबू बजरंगीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.