गुजरात काही पाकिस्तानमध्ये नाही ! मुख्यमंत्र्यांनी धमकावू नये- शरद पवार

sharad pawar

कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानार प्रकल्पाला कोकणात जागा मिळाली नाहीतर तर प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले गुजरात किंवा अन्य राज्यात प्रकल्प गेला तर तो देशातच राहील. गुजरात काही पाकिस्तानमध्ये नाही. असे शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी नानार प्रकल्पावरून धमकावू नये. असा सल्ला देखील शरद पवारांनी दिला. दरम्यान, आज नानार येथी सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली.

शरद पवार यांनी या प्रकरणात उडी घेतल्यामुळे या नानार प्रकल्प वादाला नवीन दिशा मिळण्याचे संकेत आहेत. प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी १० मे रोजी मी प्रकल्पस्थळास भेट देणार आहे. पण तिथे सभा वगैरे घेणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.