राज्यसभा निवडणूक : गुजरात उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

गुजरात उच्च न्यायालय

अहमदाबाद : गुजरात राज्यसभा निवडणुकीत दोन आमदारांची मते रद्द केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. न्यायालायाने निवडणूक आयोगासह भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनाही नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 21 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.भाजपचे बलवंत सिंग राजपूत यांनी गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगासह अन्य जणांना नोटीस बजावली.