गुजरात निवडणूक ट्रेलर,राजस्थानची पोटनिवडणूक इंटरव्हल आता संपूर्ण पिक्चर २०१९ मध्ये

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणूक ट्रेलर होता. राजस्थानची पोटनिवडणूक इंटरव्हल आहे. आता संपूर्ण पिक्चर २०१९ मध्ये पूर्ण होईल,’ अस म्हणत राजस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘२०१९ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा बाणातून तीर सुटला की तो परत येत नसतो,’ असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केल.

राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला आहे. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असतानाही भाजपच्या खात्यातून या तीन जागा काँग्रेसने खेचून घेतल्यानंतर भाजपवर सर्वच पक्षाने टीका करायला सुरुवात केली आहे.

You might also like
Comments
Loading...