Gujarat Election Results 2022 | गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप विक्रमी बहुमताकडे वाटचाल करत आहे. गुजरातमधील पूल दुर्घटनेनंतर चर्चेत आलेल्या मोरबीच्या जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. पहिल्या टप्प्यात मोरबीच्या या जागांवर मतदान झाले होते. गुजरातमधील मोरबीमध्ये भाजपचे उमेदवार कांतीलाल शिवलाल यांचा विजय झाला आहे. मोरबी येथील अपघातानंतर त्यांनी अनेकांचे प्राणही वाचवले होते, यासाठी जनतेने त्यांना बक्षीस दिले आहे.
गुजरातमध्ये 182 जागांपैकी 158 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस 17 तर आप 5 जागांवर आघाडीवर आहे. मात्र आपला अजून विजयाचे खाते उघडता आले नाही. मोरबीमध्ये कांतीलाल शिवलाल यांना 1,14,538 मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार जयंतीलाल पटेल यांना 52,459 मते मिळाली.
गुजरातमध्ये 182 विधानसभा जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. गुजरातमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या (आप) जोरदार उपस्थितीमुळे यावेळी निवडणूक लढत तिरंगी झाली.
गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. 2002 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये 127 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
2017 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर एकूण 182 जागांपैकी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये आतापर्यंत भाजपने 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. आता भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा दावा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gujarat Election Results 2022 | गुजरात निकालांवर नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले…
- SSC Ricruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Ravi Rana | “महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेत येईल” ; रवी राणा यांचा विश्वास
- Nana Patole | “गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही”; नाना पटोले असं का म्हणाले?
- Skin Care Tips | ‘या’ पद्धतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास मिळू शकतात अनेक फायदे