जिथं पंतप्रधानांनी केली होती’स्मार्ट सिटी’ची घोषणा तिथंच भाजपचा १५ हजार मतांनी पराभव

टीम महाराष्ट्र देशा: २०१७ च्या गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान घोषणा दिली होतो की, ‘हूं छू विकास’ म्हणजे मी आहे विकास आणि त्यांच्या याच विकास मॉडेलचा एक भाग होता ‘स्मार्ट सिटी.’ अशीच एक स्मार्ट सिटी दाहोद मतदार संघात प्रस्तावित होती. आणि याशिवाय वलसाडच्या प्रचारसभेतील पंतप्रधानांचा औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पंतप्रधान म्हणाले होते. कॉंग्रेसच राज्य म्हणजे औरंगजेबच राज्य आहे’ काही जाणकारांच अस देखील म्हणन आहे की गोध्रा कांडाची खरी सुरवात ही दाहोद मधूनच झाली होती.

येथून गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे वाजेसिंहभाई निवडून आले होते. पण अस देखील नाही की भाजप येथून पूर्णपणे गायब आहे. जिल्ह्यातील ६ पैकी ३ जागा या भाजपकडे आहेत. या वेळेस कॉंग्रसचे वाजेसिंहभाई पारसिंहभाई यांना 79,850 मत पडली आहेत तर भाजपच्या कनैयालाल किशोरी बाचुभाई यांना 64,347 अर्थात या जागेवर कॉंग्रेस 15,503 मतांनी जिंकली आहे.

You might also like
Comments
Loading...