ब्ल्यटूथद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाडीचा आरोप; गुजरातमध्ये सहा ठिकाणी आज फेरमतदान

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात मध्ये दुसऱ्या टप्प्यात ब्ल्यटूथद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाडीच्या आरोपांनंतर आज ६ ठिकाणी फेरमतदान होणार आहे. १४ डिसेंबरला दुसऱ्या टप्पात जेव्हा मतदान झाले तेव्हा या मतदान केंद्रावर ब्ल्यटूथद्वारे ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याची तक्रार आली होती. परंतु, याबद्दल कोणताही पुरावा मिळाला नाही.

वडगाम विधानसभा मतदारसंघातील छानियां-1 आणि छानियां-2, विरमगाम विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर 27, दस्करोई विधानसभा मतदारसंघातील नारोदा मतदान केंद्र, सावली क्षेत्रातील नहारा-1 आणि सकारदा-7 या ठिकाणी पुन्हा निवडणूक होणार आहे. दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

निवडणूक आयोगाने दहा मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी करण्याचेही आदेश दिले आहेत. ज्या केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे, तिथे मॉक ड्रील म्हणजे मतदानापूर्वी केलेल्या अभ्यासाचा डेटा हटवण्याचं अधिकारी विसरले होते. त्यामुळे पुन्हा नव्याने मतदान घेण्यात येणार आहे.

You might also like
Comments
Loading...