अमित शहांचा एक फोन आणि नितीन पटेलांचे बंड झाले थंड

टीम महाराष्ट्र देशा: आज सकाळी ७.३० वाजता मला अमित शहांचा फोन आला. तुमची नाराजी मी समजू शकतो. मात्र आम्ही तुम्हाला असे खाते देऊ ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. असे आश्वासन मला अमित शहानी दिले त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्न उरलाच नाही. अस स्पष्ट करत गुजरात मध्ये नितीन पटेलांनी उगारलेली बंडाची तलवार म्यान केली आहे.

गुजरात मध्ये भाजपने निसटता विजय मिळवल्यावर तोलामोलाचे खाते न मिळाल्याने नितीन पटेल नाराज झाले होते. मात्र नितीन पटेलांना गुजरातचे उपमुख्यमंत्री केल्याने आता हे बंद शमले आहे. तर मी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अस स्पष्ट करून नितीन पटेलांनी सगळ आहे सुरळीत असल्याच सांगितलं आहे.