fbpx

गुजरात कॉंग्रेसला मोठे खिंडार, या ओबीसी नेत्याची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच गुजरात मध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर कॉंग्रेसचा हात सोडला आहे. अल्पेश ठाकोर यांचे जवळचे सहकारी धवल झाला यांनी याबाबतची अधिकृत माहिती टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.

याआधी देखील अल्पेश ठाकोर हे कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावेळी तूर्तास तरी पक्ष सोडणार नसून पक्षात राहून समाजाच्या हक्कासाठी लढणार असल्याच स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता गुजरातच्या विधान सभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षा कडून आम्हाला दुर्लक्षित करण्यात आले असे कारण पुढे करून अल्पेश ठाकोर यांनी अखेर कॉंग्रेस ला रामराम ठोकला आहे. अद्याप अल्पेश ठाकोर यांनी भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत की नाही हे अजून स्पष्ट केलेलं नाही.

दरम्यान अल्पेश ठाकोर यांनी जर भाजप मध्ये प्रवेश केला तर मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्पेश ठाकोर हे भाजप मध्ये जाणार असल्याची दाट शक्यता आहे.