गुजरातमध्ये मिळणार पेट्रोल – डिझेल स्वस्त

पेट्रोल - डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे नागरिक हैराण

वेब टीम :देशभर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने नागरिक हैराण असताना गुजरात सरकारनं नागरिकांना खुशखबर दिलीय.पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी घेतला आहे.व्हॅट कमी केल्यानंतर गुजरातमध्ये पेट्रोल – डिझेल स्वस्त होणार आहे.

देशभर पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर इंधनांवर लागणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याची मागणी केंद्रानं राज्य सरकारकडे केली होती. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या आवाहनानंतर भाजपप्रणित राज्यांत पेट्रोल – डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्यात. त्यामुळे गुजरातप्रमाणेच इतर भाजपप्रणित राज्यांतही पेट्रोल – डिझेल स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. अद्याप हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही.

You might also like
Comments
Loading...