राहुल गांधींच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहीला ? ९ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : गुजरात सेंट्रल यूनिव्हर्सिटीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने ९ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राध्यापक असूनही तुम्ही राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात का उपस्थित राहिलात? असा प्रश्न विचारत यूनिव्हर्सिटीने या नऊ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या एका कार्यक्रमात हे नऊ प्राध्यापक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपविरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते.

गुजरातमधील या प्राध्यापकांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीवर काँग्रेसच्या गोटातून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...