पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुजरातमध्ये सुरूवात

मोदी

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. १९ जिल्ह्यातील ८९ जागांसाठी हे मतदान होत आहे. या ८९ जागांसाठी तब्बल ९७७ उमेदवार रिंगणात आहेत.

सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याच्या तयारीत असणाऱ्या राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही सोपी नाही.एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली आहे. त्या उलट प्राथमिक स्तरावर कार्यकर्त्यांची फळी मजबूत नसस्याने काँग्रेसचे आव्हान वाढले आहे.Loading…
Loading...