Share

Gujarat Assembly Elections 2022 | मतदानाचा पहिला टप्पा संपला, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान

Gujarat Assembly Elections 2022 | गुजरातमध्ये व्होटर टर्नआउट अॅपनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.38 टक्के मतदान झाले आहे. तापीमध्ये सर्वाधिक 72.32 टक्के मतदान झाले. भावनगरमध्ये सर्वात कमी 51.34 टक्के मतदान झाले. 2017 च्या तुलनेत यावेळी मतदान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. 2017 मध्ये संपूर्ण राज्यात 69.02 टक्के मतदान झाले होते.

गुजरातमध्ये व्होटर टर्नआउट अॅपनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.38 टक्के मतदान झाले आहे. तापीमध्ये सर्वाधिक 72.32 टक्के मतदान झाले. भावनगरमध्ये सर्वात कमी 51.34 टक्के मतदान झाले. 2017 च्या तुलनेत यावेळी मतदान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. 2017 मध्ये संपूर्ण राज्यात 69.02 टक्के मतदान झाले होते.

निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदानाच्या अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले आहे. काही तुरळक घटना आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी वगळता, सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 8 डिसेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

गुजरातमध्ये 27 वर्षापासून भाजपची सत्ता असून सलग सातव्यांदा सत्ता काबीज करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. यावेळी भाजपच्या विरोधात  केवळ काँग्रेस नाही तर आम आदमी पार्टी (आप) देखील मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

2017 निवडणूक निकाल-

गुजरातमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकून बहुमत मिळवले. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या. अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या. 2 जागा बीटीपी आणि एक जागा राष्ट्रवादीला गेली.

महत्वाच्या बातम्या :

Gujarat Assembly Elections 2022 | गुजरातमध्ये व्होटर टर्नआउट अॅपनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 57.38 टक्के मतदान झाले आहे. तापीमध्ये सर्वाधिक 72.32 टक्के …

पुढे वाचा

India Marathi News Politics