अन्यथा विधानसभा निवडणुकीत विरोधात उतरू;पाटीदारांचा इशारा

hardik patel

टीम महाराष्ट्र देशा – २४ तासांच्या आत आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा विधानसभा निवडणुकीत विरोधात उतरू, असा इशारा हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार अनामत आंदोलन समितीने कॉंग्रेसला दिला आहे.पाटीदार आरक्षणासंदर्भात प्रस्तावित ‘फॉर्म्युला’ला अंतिम स्वरुप देण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार अनामत आंदोलन समिती आणि काँग्रेसमध्ये शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याने पाटीदार नेते नाराज आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Loading...

काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नेते व्यग्र होते. त्यामुळे पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांची भेट घेता आली नाही. सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आज पाटीदार नेते भेट घेऊ शकतात, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे मात्र ‘आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीला बोलावले होते. बराच वेळ त्यांची वाट पाहिली. मात्र, त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. तसेच पक्षश्रेष्ठींसमवेत बैठकीचे आयोजन करणारे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी फोनही उचलला नाही, असे समितीचे सदस्य दिनेश बम्भाणिया यांनी सांगितले.पुढील २४ तासांत भूमिका स्पष्ट केली नाही तर, काँग्रेसला विरोध करू. काँग्रेसच्या पाटीदार समाजातील उमेदवारांनाही विरोध करण्यात येईल, असा इशारा बम्भाणिया यांनी दिला. .Loading…


Loading…

Loading...