गुजरातलाही मुसळधार पावसाने झोडपले ; नद्यांना पूर

Gujarat also suffered heavy rains

अहमदाबाद : गुजरातला काल मंगळवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.  गुजरात किनारपट्टीनजीक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २ सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

काळ मंगळवारी सौराष्ट्र आणि गुजरातच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला . भावनगर , जुनागड , बडोदा , छोटा उदयपूर , खेडा , आणंद आदी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे .