पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतपत राहू नये- शरद पवार

मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर आपली मते मांडली आहेत. केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी अजित पवारांचं स्टेटमेंट वाचलंय. पाहुणे येतात अनेक ठिकाणी येतात. एक दिवस येतात, दोन दिवस येतात, तीन दिवस येतात. मात्र आजचा सहावा दिवस आहे. पाहूणचार घ्यावा, मात्र, त्यामध्ये अजीर्ण होईल इतपत पाहुणचार असू नये. माझा अनुभव असाय की, तिन्ही मुलींचा कारखाना नाहीये, एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि एक हाऊसवाईफ आहे. या तिघींचाही काहीही संबंध नाहीये. दोन-तीन दिवस झाले, घरचे वाट बघत असतील. आम्हाला सूचना आहेत, की सूचना मिळाल्याशिवाय, सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

केंद्र सरकार काही यंत्रणांचा गैरवापर करत आहे. सीबीाय इन्कम टॅक्स, ईडी असेल एनसीबी या सर्व एजन्सीचा वापर राजकीय दृष्टीने केला जात आहे. त्यात काही उदाहरण द्यायचंच तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री. अनिल देशमुखांवर त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. मला येऊन भेटले होते. त्यांनी आरोप केले. त्यातून जे वातावरण झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा दिला. ज्यांनी आरोप केला ते कुठे आहे ते माहीत नाही, असं शरद पवारांनी सांगितलं.

जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. देशमुखांनी बाजूला व्हायची भूमिका घेतली. आता आरोप करणाऱ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. देशमुख बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले आहेत. देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा मारला. त्याच घरात पाचवेळा जाऊन छापा मारण्याचा विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. पाच पाचवेळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जाणं कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही शरद पवार सांगितलं.

महत्वाच्या बातम्या